महाराष्ट्र

मा. आमदार मारोतराव पवार व शिवसेना नेते संभाजी पवार यांनी हाती बांधले घड्याळ

सर्वांचे पक्षात स्वागत, छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली, समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात पक्षाचा होईल विस्तार; अजित पवार

मुंबई: येवला विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मारोतीराव पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संभाजी पवार यांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

या पक्षप्रवेशापूर्वी दोन्ही नेत्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत पक्षप्रवेशाबाबत सविस्तर चर्चा केली.

येवला विधानसभा मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व कायम असून त्यांची ताकद आणखी वाढत आहे. माजी आमदार मारोतराव पवार आणि शिवसेना नेते संभाजी पवार या दोन्ही नेत्यांचा प्रवेश झाल्याने मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाला अधिक बळ मिळाले आहे. या प्रवेशामुळे तालुक्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फायदा होईल असे अजित पवार म्हणाले.

यावेळी माजी आमदार मारोतराव पवार, येवला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रतन बोरनारे, जिल्हा दुध संघाचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब खैरनार, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अर्जुन कोकाटे,शिवसेना उपतालुका प्रमुख व येवला माजी सभापती पुंडलिकराव पाचपुते,येवला पंचायत समितीचे माजी सभापती प्रविण गायकवाड, येवला माजी सभापती मंगेश जाधव, येवला शिवसेना उपतालुका प्रमुख चंद्रकांत शिंदे, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गणपत भवर, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण काळे, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बापूसाहेब गायकवाड, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कांतीलाल साळवे, येवला खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन दिलीपराव मेंगाळ, येवला खरेदी विक्री संघाचे संचालक भास्कर येवले, येवला पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव आठशेरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

11 मिनिटे ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

11 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

12 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

15 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

15 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

15 तास ago