महाराष्ट्र

पुण्यात पशुवैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

महिला पशुपालकांच्या सक्षमीकरणावर भर; पशुसंवर्धन विभागाच्या यशोगाथा सोशल मीडियातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन

पुणे: पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पशुवैद्य, तज्ज्ञ आणि प्रगतशील पशुपालकांचा गौरव ‘ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र’तर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात आला. औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रमेश वझरकर यांनी सांगितले की, २०११ मध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांचे वडील ज्येष्ठ पशुवैद्य डॉ. दिवाकर शंकर गोऱ्हे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी संशोधक प्राध्यापकांसाठी स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्याची सूचना त्यांनी केली होती. त्या इच्छेनुसार डॉ. गोऱ्हे यांनी आर्थिक मदत देत ‘डॉ. दिवाकर शंकर गोऱ्हे पुरस्कृत उत्कृष्ट पशुवैज्ञानिक पुरस्कार’ सुरू केला. यंदा हा पुरस्कार मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. रवींद्र जयवंत झेंडे यांना प्रदान करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. गोऱ्हे यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, त्यांनी BAIF संस्थेत तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ग्रामीण विकासासाठी मोठे योगदान दिले. संकरित पैदास कार्यक्रम आणि पशुधनासाठी लस निर्मिती क्षेत्रात त्यांचे कार्य प्रेरणादायी असून ‘फूट अँड माऊथ डिसीज’वरील औषध संशोधनातही त्यांचा मोठा वाटा होता.

परदेशात पाळीव प्राण्यांच्या डॉक्टरांची कमतरता भासत असताना भारतातील पशुवैद्यकीय सेवेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, या व्यवसायाला अजून पुरेसे महत्त्व मिळालेले नाही. शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार पशुसंवर्धन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून विभागाच्या बजेट तरतुदींवर आपले विशेष लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पशुसंवर्धन विभागाने आपल्या यशोगाथा आणि शासकीय योजनांची माहिती सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करत त्यांनी आगामी इंटरनॅशनल महिला दिवस निमित्त ‘महिला शेतकरी वर्ष’ साजरे होत असल्याचे सांगितले. महिला पशुपालकांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी २ लाख ५१ हजार रुपयांचा निधी दिला. तसेच वडिलांनी लिहिलेले ‘माझ्या जीवन लहरी’ हे पुस्तक डॉ. प्रविणकुमार देवरे यांना भेट दिले.

यंदाचे पुरस्कारप्राप्त मानकरी

जीवनगौरव पुरस्कार: डॉ. लक्ष्मण सांडूजी वाणी

उत्कृष्ट पशुवैद्य: डॉ. सचिन वंजारी (सांगली), डॉ. पल्लवी कुरुंदकर (कोल्हापूर)

प्रगतशील पशुपालक: शिवानंद होनमोटे (सोलापूर – पशुपालन), सचिन लाखे (धाराशिव – कुक्कुटपालन), जयश्री गाढवे (पुणे – शेळीपालन), अमोल पवार (सातारा – मेषपालन)

कार्यक्रमास पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. श्री. मुकणे, डॉ. रमेश वझरकर, जेहलम जोशी, रश्मी जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘दूध’ या विषयावरील स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले. आभार उपाध्यक्ष डॉ. विवेक क्षीरसागर यांनी मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

21 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

21 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

21 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

21 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

22 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

22 तास ago