महाराष्ट्र

परवडणाऱ्या घरांसाठी घर हक्क परिषदेची आता रस्त्यावरची लढाई

हक्कांच्या घरांसाठी ३१ संघटनांचा एल्गार, गिरण्या व कारखान्यांच्या संपूर्ण जागेवर घरे द्या, मुंबईबाहेर घरे घेणार नाही.

मुंबई: घर हक्क परिषदेच्या माध्यमातून विविध ३१ संघटना एकत्र आल्या असून परवडणारी घरे मिळाली पाहिजेत यासाठी या संघटना लढा देत आहेत. भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची घरे मुंबईतच मिळाली पाहिजे, मुंबई बाहेर शेलू वांगणी सारख्या दूर जागी जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत बंद पडलेल्या गिरण्या व कारखान्यांच्या फक्त ३३ टक्के जागेवर नाही तर संपूर्ण जागेवर ही घरे द्यावीत. हक्कांच्या घरासाठी सर्व संघटना एकत्र येऊन तीव्र लढा येणार असून नागपुरच्या अधिवेशनावर भव्य मोर्चा काढून सरकारलाही जागे करु, असे घर हक्क परिषदेच्या वतीने विश्वास उटगी यांनी म्हटले आहे.

गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी म्हणाले की, सरकार आम्हाला जमीन देत नाही मात्र काही उद्योगपतींना या जमिनी देत आहे. भाड्याच्या घरात राहणारे, पागडीवर राहणारे, झोपडपट्टीत राहणारे तसेच जुन्या इमारातींच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न आहे पण सरकार या लोकांचे हक्काच्या घराचे अधिकार दडपून टाकत आहे. या जागा बिल्डरांना देऊन मुळ भूमीपूत्रांना मात्र मुंबईच्या बाहेर घालवले जात आहे. १ लाख १० हजार गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी नोंदणी झालेली आहे पण मागील २५ वर्षात अवघी १५ हजार घरे देण्यात आली आहेत.

लाखो कामगारांना त्वरित घरे का मिळाली नाहीत? मुंबई बाहेरील धुळे, सोलापूर, इचलकरंजी, नागपूर अशा अनेक ठिकाणी बंद पडलेल्या NTC मिल कामगारांना न्याय कधी मिळणार? राज्य सरकारने १ ऑगस्ट २०१९ ला जीआर काढून शेलू, वांगणीला घरे देऊ असे म्हटले आहे. हा जीआर रद्द करण्याची मागणी असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांना तसे निवेदन दिलेले आहे, जीआर बदलण्याचे आश्वासन दिले आहे पण अजून अंमलबजावणी मात्र झालेली नाही.

राज्य सरकारचे गृहनिर्माण धोरण हे परवडणारी हक्काची घरे नाकारणे आहे. या भूमिपुत्रांनी कुठे जायचे, या प्रश्नावर न्यायलयात लढा सुरु असून भूमिपुत्रांच्या बाजूने निकाल असतानाही त्याची अंमलबजावणी केली जात नाही म्हणून सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. २३ नोव्हेंबरला पहिली सभा शैलेंद्र विद्यालय दहिसर पूर्व येथे हेाईल तर दुसरी सभा कांजूर मार्ग/ भांडूप येथील वस्त्या मध्ये हेाईल, त्यानंतर ठाणे, पनवेलसह इतर भागातील वस्त्यांमध्ये या सभा घेतल्या जाणार आहेत. हक्कांच्या घरासाठी सर्व राजकीय पक्षांची मदत घेऊ तसेच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदनही देणार आहोत असे विश्वास उटगी यांनी सांगितले. यावेळी धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, शिशिर ढवळे, दत्तात्रय अट्याळकर, आसिष मिश्रा आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

5 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

12 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

12 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

13 तास ago