शिरूर तालुका

आमदाबाद येथील नितीन थोरात यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान!

शिरूर : शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावचे सुपुत्र आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी नितीन थोरात यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला. श्री. थोरात यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जिल्हा परिषद पुणे, कृषी विभाग (महाराष्ट्र शासन), आत्मा पुणे आणि पंचायत समिती हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरधवल जगदाळे अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे व प्रमुख उपस्थिती सभापती महिला व बालकल्याणच्या अंकिता पाटील त्याचबरोबर सभापती कृषी पशुसंवर्धन व दुग्धविकास अमोल नलावडे तसेच दिपाली होलावळे, विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिपाली गव्हाणे तसेच जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शरदचंद्रजी पवार सभागृह, जिल्हा परिषद,पुणे येथे कार्यक्रम पार पडला.

यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शासकीय कृषी सन्मानाने सन्मानित असलेल्या शेतकऱ्यांचा गौरव या निमित्ताने करण्यात आला. शिरूर तालुक्यातील नितीन अर्जुन थोरात यांचाही सन्मान सभापती अमोल नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, हवेली, मुळशी, मावळ, खेड, जुन्नर, भोर, वेल्हे, आंबेगाव, पुरंदर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून शेतकरी, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शेतकऱ्याच्या श्रमाचा हा गौरव जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगितले.

नितीन थोरात: शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता!

आमदाबाद येथील नितीन थोरात यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर!

नितीन थोरात यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

6 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

6 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

6 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

6 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

6 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

17 तास ago