मुंबई: भाजपचे आमदार परिणय फुके यांनी राज ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे “चोराच्या उलट्या बोंबा” असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे. ज्यांच्या पक्षावर सातत्याने पक्षफोडीचे आरोप झाले, त्यांनी इतरांना फोडाफोडीचे धडे देणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या बुद्धिमत्तेचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले.
ॲड. मातेले म्हणाले की, राज ठाकरे यांनी कधी इतर पक्षांचे आमदार, खासदार किंवा कार्यकर्ते फोडून स्वतःचे राजकारण उभे केले का, याचे उत्तर भाजपने आधी जनतेला द्यावे. गेल्या काही वर्षांत देशातील अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी आपल्या पक्षात घेऊन सरकारे स्थापन करण्याच्या घटना घडल्या असून, फोडाफोडीच्या राजकारणाचा सर्वाधिक ठसा भाजपवरच उमटल्याचे त्यांनी नमूद केले.
जनतेने एका पक्षाच्या चिन्हावर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना सत्तेच्या समीकरणासाठी आपल्या गोटात घेऊन सरकारे स्थापन करणे आणि त्यालाच नैतिकतेचा मुलामा देणे, ही राजकीय संस्कृती महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही, असेही ते म्हणाले.
भाजपला बहुतेक दुसऱ्यांच्या पक्षातील नेत्यांनाच अधिक महत्त्व देण्याची सवय लागली असून, स्वतःच्या कार्यकर्त्यांपेक्षा आयात केलेल्या नेत्यांवर त्यांचा अधिक विश्वास असल्याचे चित्र दिसते, असा टोला त्यांनी लगावला.
दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापूर्वी भाजपने स्वतःच्या राजकीय भूमिकेचा आरसा पाहावा. महाराष्ट्रातील सुजाण जनता सर्व काही पाहत असून योग्य वेळी त्याचा राजकीय हिशेब करेल, असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला.
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…
मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…
ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…
जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…