महाराष्ट्र

अत्याधुनिक बायोसायन्सेस–टेक्नॉलॉजी संशोधन व इनक्युबेशन लॅब स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे आणि बायोएरा लाइफ सायन्सेस प्रा. लि., पुणे यांच्यात अत्याधुनिक ‘स्टेट-ऑफ-द-आर्ट बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी रिसर्च–इन्क्युबेशन लॅब (SoABRIL)’ स्थापन करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, मुंबई येथे विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्रा. कर्भारी काळे आणि बायोएरा चे कॉर्पोरेट डायरेक्टर सिद्धार्थ सालुंके राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बायोसायन्सेस-टेक्नॉलॉजी क्षेत्रातील नाविन्याचा नवा अध्याय

SOABRIL ही राज्यातील पहिल्यांदाच उभी राहणारी नाविन्यपूर्ण इनोव्हेशन हब ठरणार असून शिक्षण–संशोधन–उद्योग क्षेत्रातील दरी भरून काढण्यासाठी विशेषरित्या डिझाइन करण्यात आली आहे. येथे अत्याधुनिक संशोधन, स्टार्टअप इनक्युबेशन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण आणि जागतिक आदान–प्रदानाची संधी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी, संशोधक आणि स्टार्टअप टीमना नवीन कल्पना प्रत्यक्ष उपायांमध्ये रूपांतरित करण्याची संधी मिळणार आहे.

कौशल्यविकास, नाविन्य आणि उद्योजकतेला चालना

लॅबचा उद्देश कौशल्यविकास, उच्चस्तरीय संशोधन, इनोव्हेशन अॅक्सलरेशन आणि उद्योजकतेस प्रोत्साहन देणे हा आहे. या माध्यमातून—संशोधनाचे व्यावसायिकीकरण, आंतरराष्ट्रीय सहकार्य, ज्ञान–तंत्रज्ञान देवाण – घेवाण, सामाजिक परिणामकारक प्रकल्प यांना मोठा हातभार लागणार आहे. आरोग्य, अन्नसुरक्षा, सेन्सरी डेटा, भू-स्थानिक तंत्रज्ञान, मृदा मॅपिंग आदी क्षेत्रातही ही लॅब महत्वाचे योगदान देईल.

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल

भारताच्या कौशल्य विकास मोहिमेशी आणि आत्मनिर्भर भारत ध्येयाशी सुसंगत असणारा हा उपक्रम देशाला बायोसायन्सेसमध्ये जागतिक नेतृत्वाच्या दिशेने नेणारे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. शिक्षण–संशोधन–उद्योग यांचे एकत्रिकरण करून SoABRIL भारतातील बायोसायन्सेस क्षेत्राचे भविष्य नव्याने परिभाषित करेल आणि समाजाभिमुख नवकल्पनांना चालना देईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

3 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago