महाराष्ट्र

‘मी मराठवाड्याची लेक; तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही’; सुनेत्रा पवार

शेतशिवाराची पाहणी; बळीराजाच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या अडचणी

नांदेड: ‘मी मराठवाड्याची लेक आहे’… या मातीतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी मला समजतात…कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला.

दरम्यान शेतकऱ्यांच्या लेकरा-बाळांचे शिक्षण… जनावरांचा चारा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही शासनासाठी तितकाच महत्त्वाचा आहे असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

लोहा तालुक्यातील बारूळ फाटा, सोनखेड येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी शेतकरी संदीप रामराव जायभाय यांच्या शेताला भेट देऊन सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. ९ जुलै रोजी लागवड केलेल्या सोयाबीन पिकाची सद्यस्थिती, पिकाची वाढ, उत्पादनाची संभाव्यता तसेच पावसाअभावी झालेल्या परिणामांची शेतकऱ्यांकडून माहिती घेतली.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांशी बांधावर प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी, पिकांचे झालेले नुकसान, जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती तसेच कुटुंबाच्या दैनंदिन गरजा याबाबत जाणून घेतले.

शेतशिवारातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या असून, आवश्यक त्या मदत व उपाययोजनांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

पावसाची अनिश्चितता, पिकांचे नुकसान आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वाघोलीत अनैतिक संबंधांच्या संशयातून रिक्षाचालकाची निघृणपणे हत्या…

पुणे : वाघोलीत अनैतिक संबंधांच्या संशयातून एका रिक्षाचालकाची निघृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली…

12 मिनिटे ago

शिक्रापूर! हॉटेलमध्ये काम करताना अचानक घाम आला अन् काही वेळातच…

शिरूर : शिक्रापूर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली…

1 तास ago

बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी तालुकाप्रमुखाचा मृत्यू; चार महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

शिवाजीराव शिंदे यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात खळबळ; आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू बीड…

2 तास ago

फणसासह कधीही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन; नाहीतर उद्भवतील अनेक समस्या

फणस फक्त खाण्यासाठीच चविष्ट नाही, तर आरोग्यासाठीही तो खूप फायदेशीर आहे. त्यात फायबर, जीवनसत्त्वे व…

2 तास ago

मध हे पंचामृतातील एक अमृत

दूध, दही, तूप, मध, गूळ या पाच वस्तूंपासून बनते ते पंचामृत. या पाचही वस्तूला आपल्या…

2 तास ago

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…

16 तास ago