आरोग्य

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी जेवण स्किप करतात, तर काही जण कित्येक तास जीममध्ये देखील घालवतात. पण तरी देखील वजन कमी होत नाही. अशात तुमच्या काही सवयी यासाठी जबाबदार असू शकतात. जेव्हा लोकांना वजन वाढण्याची चिंता वाटते, तेव्हा ते सर्वात आधी आपल्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवतात. हे योग्यच आहे. पण त्यासबोतच काही सवयी देखील सुधाराव्या लागतील… तर कोणत्या आहेत त्या चुका जाणून घ्या. झोपेच्या वेळापत्रकापासून कॅलरीजकडे लक्ष देण्याची फार

जर तुमचे झोपेचं वेळापत्रक निश्चित नसेल किंवा तुम्ही दररोज एकाच वेळी झोपत नसाल, तर हे वजन वाढण्याचं एक प्रमुख कारण असू शकतं. आजकाल लहान मुलांमध्येही लठ्ठपणा दिसून येतो. बहुतेक लोक आता रात्री उशिरा झोपतात. मग सकाळी उशिरा उठतात. यामुळे केवळ वजनच वाढत नाही, तर ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही हानिकारक आहे.

शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्यास किंवा हार्मोन्सचे असंतुलन झाल्यास वजन वाढू शकते. विशेषतः महिलांमध्ये, पीसीओएस आणि हायपोथायरॉईडीझम सारख्या स्थितींमध्ये वजन वाढलेलं दिसून येतं. जर तुमचं वजन कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वाढत असेल, तर योग्य वैद्यकीय तपासणी करून घेणं आवश्यक आहे. सतत वजन वाढणं योग्य नाही.

जर तुम्ही कोणतीही औषधं घेत असाल, तर त्यामुळेही वजन वाढू शकतं. योग्य सल्ल्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, जेणेकरून ते तुम्हाला आहार आणि व्यायामाबाबत योग्य मार्गदर्शन करू शकतील. यामुळे तुम्हाला तुमचं वजन सहजपणे नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

अतिरिक्त ताण कमी घ्या. जर तुम्ही सतत तणावाखाली असाल, तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे. कारण ताणामुळे वजन वाढण्यासही कारणीभूत ठरू शकतं. तणावाच्या काळात कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढू शकते. याशिवाय, लोक अनेकदा तणावाच्या काळात आपली शारीरिक हालचाल कमी करतात किंवा अति खाण्यास सुरुवात करतात.

कॅलरीजकडे लक्ष न देणे गरजेचं आहे. बाहेरचे अन्न टाळत आहोत असे वाटत असूनही आपले वजन का वाढते? वस्तुस्थिती अशी आहे की, घरी बनवलेलं जेवण करूनही आपण अनेकदा आपल्या शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीजचं सेवन करतो. यामुळे चरबी वाढते. पण कोणतेही बदल करण्यापूर्वी एकदा तरी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रात्रीच्या जेवणानंतर इवलिशी वेलची चावून खा! एक नाही अनेक गुणकारी फायदे

रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी…

1 तास ago

SIR वादावर NDAमध्येही मतभेद? कुशवाहांचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू…

1 तास ago

कडा हादरले! गणेश विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू…

2 तास ago

मीटरवरील ‘हा’ लाल दिवा देतोय मोठा संकेत! वीजबिल वाढण्याआधीच कळू शकते कारण

मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण…

2 तास ago

विखे कुटुंबातील नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत

काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला…

2 तास ago

वेलकम’ फेम अभिनेता मुश्ताक खान यांचे निधन; कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी

मुंबई : ‘वेलकम’, ‘गदर’, ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या…

2 तास ago