महाराष्ट्र

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो,” असा ठाम आणि भावनिक संदेश उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी सातारा जिल्ह्यातील अंगापूर पंचकोशीत आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळ्यात दिला. छोट्या गावांपासून दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अंगापूर येथील प्राचीन हेमाडपंथी गणपती मंदिरात दर्शन घेतल्याने स्वतःला भाग्यवान समजत त्यांनी विघ्नहर्त्याच्या कृपेने अनेक संकटांवर मात करता आली, असे सांगितले. पालकमंत्री Shambhuraj Desai आणि शरद कणसे यांच्या आग्रहामुळे हा योग जुळून आल्याचे त्यांनी नमूद केले.

“मोठ्या शहरांकडे सर्वांचे लक्ष असते, मात्र छोट्या गावांकडे दुर्लक्ष होते. पण जिथे कोणी जात नाही, तिथे एकनाथ शिंदे जातो,” असे सांगत त्यांनी कोकणातील मंदिर लोकार्पणाचा उल्लेख करत ग्रामीण भागाशी असलेले आपले नाते अधोरेखित केले.मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ५६७ निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना आणि विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. “कोणीही सत्तेत आले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या योजनेत राज्याने अतिरिक्त मदत देऊन लाभ दुप्पट केल्याचे त्यांनी सांगितले. नुकसानभरपाईच्या अटी सुलभ करणे, सिंचन प्रकल्पांना गती देणे आणि ग्रामीण विकासाचा वेग वाढवणे यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.साताऱ्याच्या मातीचे कौतुक करताना “ही माती अन्यायाविरुद्ध लढायला शिकवते,” असे ते म्हणाले. तसेच साताऱ्यातील युवक देशाच्या सीमेवर सेवा देत असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.

महायुती सरकारला मिळालेल्या जनसमर्थनाचा उल्लेख करत त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील यशाबद्दल जनतेचे आभार मानले. “२३२ जागा देऊन जनतेने इतिहास घडवला,” असेही ते म्हणाले.तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी वाढवून ५ कोटी रुपये करण्यात आल्याची माहिती देत त्यांनी वारकऱ्यांसाठी दिंडी अनुदान सुरू केल्याचे सांगितले. “या भागातील विकासकामांना निधी कमी पडू देऊ नका,” असे निर्देश त्यांनी पालकमंत्र्यांना दिले.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास, स्थानिकांना रोजगार आणि स्थलांतर रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.“आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही; पण जनतेच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी काम करत आहोत,” असे सांगत त्यांनी “माणसं कमावणं हेच खरे यश” हा संदेश दिला.या कार्यक्रमाला पालकमंत्री Shambhuraj Desai, शरद कणसे तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिंदोडी विकास सोसायटीची आर्थिक भरारी; शेतकऱ्यांना साडेसहा कोटींहून अधिक कर्जपुरवठा; लाभांश वाटप…

शिंदोडी (तेजस फडके) : शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याबरोबरच सहकार क्षेत्रात आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हतेचा आदर्श…

38 मिनिटे ago

Video! चिंचणीच्या गायरान जमिनीवर वाळूमाफियांचा बेकायदेशीर कब्जा; महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष की अभय…?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणात गेल्या पाच वर्षांपासून बेकायदेशीर वाळू…

46 मिनिटे ago

Video; वाळू माफिया दिवसाढवळ्या घोड धरणाचे लचके तोडत असताना पुणे आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी जीवनदायिनी ठरलेल्या चिंचणी (ता.…

24 तास ago

पिंपरी-चिंचवड पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ! ६५ नवीन वाहने, ४ ड्रोन अन् AI CCTV नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…

2 दिवस ago

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

2 दिवस ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

2 दिवस ago