महाराष्ट्र

तू आमदार कसा होतो तेच मी बघतो! अजितदादांनी ताकद लावली अन्…

पुणे: विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसला गळती लागली आहे. पुण्यातील काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार पक्षाचा हात सोडणार आहे. संग्राम थोपटे, रविंद्र धंगेकर यांच्यानंतर आता संजय जगताप यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. ते पुरंदरचे माजी आमदार आहेत. १६ जुलैला ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांचा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. हा कार्यक्रम सासवडला होण्याची शक्यता आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत संजय जगताप यांनी पुरंदर मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधीत्व केलं. २०२४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी त्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे जगताप हे शिवतारेंचा पराभव करुनच आमदार झाले होते.

जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे. यामुळे पुण्यात काँग्रेसची स्थिती आणखी तोळामासा झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपनं पश्चिम महाराष्ट्रात मोठा विस्तार केला आहे. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पाठोपाठ आता संजय जगताप यांनीही काँग्रेसला रामराम केला आहे. या दोन्ही माजी आमदारांनी भाजपची वाट धरली आहे.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतलेली सभा राज्यभरात गाजली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकसंध होती. भाजपच्या कांचन कुल यांचं आव्हान सुळे यांच्यासमोर होतं. त्यांचा प्रचार शिवसेनेचे उमेदवार आणि तत्कालीन आमदार विजय शिवतारे करत होते. शिवतारेंनी केलेल्या टिकेला उत्तर देताना अजित पवारांनी सेना आमदाराला ओपन चॅलेंज दिलं होतं.

तू 2019 आमदार कसा होतो हेच बघतो, अशी धमकी अजित पवारांनी प्रचारसभेत भाषण करताना दिली होती. सुळेंवर टीका करणाऱ्या शिवतारेंच्या पराभवासाठी अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीला पूर्ण ताकद लावली. अख्ख्या महाराष्ट्राला माहित्येय, मी जर एखाद्याला ठरवलं एखाद्याला आमदार नाही करायचं, तर कोणाच्या बापाला ऐकत नाही, असं अजित पवार म्हणाले होते. शिवतारेंच्या पराभवासाठी अजित पवारांनी फिल्डींग लावली. काँग्रेसचे संजय जगताप ३१ हजार ४०४ मतांनी विजयी झाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

8 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

11 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

13 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago