महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींना हात लावाल तर रस्त्यावर उतरू; विजय वडेट्टीवारांचा इशारा

गडचिरोली : प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे अधिग्रहण करण्यास विरोध करत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. राखी (गुरवला) येथे शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणस्थळी भेट देत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. “विकासाला विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणे मान्य नाही,” अशी ठाम भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.

सुपीक जमिनीऐवजी पडीक जमिनीचा पर्याय तपासा!

गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा आपण विधानसभेतही उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ नका, ही आपली स्पष्ट मागणी असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. विमानतळ उभारायचाच असेल, तर परिसरातील पडीक जमिनीचा पर्याय तपासावा. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे अधिग्रहण करून त्यांच्या उपजीविकेवर घाला घालू नये, असे ते म्हणाले.

पालकमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

या प्रश्नावर जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या भविष्याशी संबंधित एवढ्या गंभीर प्रश्नावर पालकमंत्र्यांनी समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

“जबरदस्तीने जमीन घेतल्यास आंदोलन तीव्र करू”

शासन निर्णय झाला असला, तरी शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने जमिनी घेण्यास आपला विरोध राहील, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू; मात्र शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा लढा थांबवणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेणे योग्य नाही. त्यामुळे विमानतळासाठी पडीक जमिनीचा पर्याय स्वीकारून शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाचवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

आगामी विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा लावून धरणार असल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी जमीन अधिग्रहणाविरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

9 तास ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

9 तास ago

शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…

9 तास ago

भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा…

9 तास ago

अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…

9 तास ago

इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या विकासकामांना गती द्या! चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विकासकामांना गती…

9 तास ago