सुनेत्रा पवारांकडून नियुक्त्यांची घोषणा; पार्थ पवारांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी, तर आमदार झिशान सिद्दीकी यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली.
मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी आज सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी पक्षाचे अन्य नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
या नियुक्त्यांमुळे पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील संवादाची जबाबदारी उमेश पाटील यांच्याकडे, तर मुंबईतील संघटनात्मक बांधणीची जबाबदारी झिशान सिद्दीकी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
लोकनेते अजितदादा पवार यांचे विचार, आदर्श आणि जनसेवेचा वारसा पुढे नेत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी निष्ठेने आणि समर्पणाने काम करावे, अशी अपेक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
या नियुक्त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासह राष्ट्रीय स्तरावरील भूमिका प्रभावीपणे मांडण्यावर आणि मुंबईतील पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर दिल्याचे चित्र आहे.
अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…
फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…
शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…
‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा…
सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…
मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विकासकामांना गती…