मुंबई: अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या तसेच संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपचा पर्दाफाश करत राहणार असल्याचा ठाम इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. भाजपाला माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
सपकाळ म्हणाले की, काही भाजपा आमदार व नेत्यांनी “माझी जीभ कापून आणणाऱ्याला बक्षीस” जाहीर केल्याची माहिती आहे. त्यांनी उपरोधिकपणे म्हटले की, माझी जीभ कापल्यानंतर जर भारतीय शेतकऱ्यांचे अमेरिकेतून होणाऱ्या आयातीपासून संरक्षण होणार असेल, अन्यायकारक व्यापार करार रद्द होणार असतील, शेतमालाला योग्य भाव मिळणार असेल आणि शेतकरी कर्जमुक्त होणार असतील तर माझी जीभ जरूर कापा. तसेच हिंदू-मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालणे थांबणार असेल आणि चीनने बळकावलेला भूभाग परत मिळणार असेल, तर त्यासाठीही मी तयार आहे, असे त्यांनी ठणकावले.
छत्रपतींबाबत चुकीचे बोलल्याचा आरोप फेटाळताना सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण काहीही अवमानास्पद विधान केलेले नाही. महाराजांची कीर्ती चंद्राप्रमाणे वाढत राहावी, याबाबत दुमत नाही. मात्र माझ्या विधानाचा विपर्यास करून महाराष्ट्रात तणाव निर्माण करण्याचा आणि दंगली घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.
सपकाळ यांनी पुढे दावा केला की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही संवेदनशील मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हा सर्व प्रकार रचला जात आहे. अमेरिकेबरोबरच्या संभाव्य व्यापार करारामुळे देशातील शेतकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो, तसेच महाराष्ट्रातील इतर ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नसल्याने मुद्दाम वाद निर्माण केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.भाजपाने या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…