महाराष्ट्र

संविधान जनमानसात रुजवणे ही काळाची गरज; ‘संविधान प्रत्येक घरात’ हा संदेश अधिक जोमाने पोहोचवू

संभाजीनगर ही बाबासाहेबांची कर्मभूमी; संविधान सर्वसमावेशकतेचे सर्वोत्तम उदाहरनार्थ; मंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर: संविधान दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरातील वंदे मातरम सभागृह येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि सामाजिक न्याय मंत्री मा. संजय शिरसाट उपस्थित होते. कार्यक्रमास मा. आयुक्त, समाज कल्याण विभाग श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, प्रादेशिक उपायुक्त डॉ. दीपक खरात, माजी महापौर नंद कुमार घोडिले, जात पडताळणी समिती अध्यक्ष हरपाळकर सर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी प्रास्ताविकातून संविधान जागृतीची दिशा स्पष्ट केली. बार्टी मुख्यालय, पुणे येथे उभारण्यात आलेल्या ‘कोणशील’चे डिजिटल स्वरूपात उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

“प्रत्येक घरात संविधानाची गरज”; डॉ. नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून संविधान व सामाजिक न्याय या विषयाला व्यापक ऐतिहासिक व सामाजिक संदर्भ जोडत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,“आपण आज उद्देशिका वाचली आणि भारताच्या राज्यघटनेत दिलेल्या समानतेच्या अधिकारांची पुन्हा जाण करून घेतली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असामान्य दूरदृष्टीने देशासाठी समतेचा पाया घातला. महिलांना मतदानाचा अधिकार असो, एकपत्नीत्वाचा कायदा असो किंवा हिंदू कोड बिल — या सर्व सुधारणांसाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला.” त्यांनी तरुण पिढीला आणि जनतेला आवाहन करत सांगितले, “प्रत्येक गावात संविधान पोहोचवणे गरजेचे आहेच, पण आता प्रत्येक घरात संविधान पोहोचले पाहिजे. घरातच मुलींचे अत्याचार, हुंडा, छळ यांसारख्या समस्या घडत असतात. समाजमाध्यमांवरील असंयमित वक्तव्ये व द्वेषपूर्ण भाष्येही आज आव्हान ठरत आहेत. संविधानाचा खरा अर्थ व मूल्ये आपल्या वर्तनात उतरायला हवीत.”

डॉ. गोऱ्हे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या उपक्रमांचे कौतुक करत बार्टीचे मुख्य कार्यालय संभाजीनगरमध्ये येणार असल्याबद्दल अभिनंदन व्यक्त केले. संभाजीनगर हे केवळ मराठवाड्याचे नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे केंद्र आहे, असे सांगत त्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी सातत्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याचे महत्त्व मांडले.

बाबासाहेबांची कर्मभूमी संभाजीनगर… संविधान सगळ्यांसाठी; मंत्री संजय शिरसाट

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत संविधानाच्या महत्त्वावर भाष्य केले. संभाजीनगर ही बाबासाहेबांची कर्मभूमी असल्याने येथे संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणं अत्यंत अर्थपूर्ण आहे. संविधानाने आपल्याला न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता दिली. अतिरेकी असो वा कुणीही—कायद्यापुढे सर्व समान आहेत. लोकशाहीची मुळे रुजवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे बाबासाहेब. ते पुढे म्हणाले, “पुढील दोन महिन्यांत बार्टीचे मुख्य कार्यालय संभाजीनगरमध्ये येत आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या काळात या शहराचे केंद्र म्हणून महत्त्व ओळखले होते. संविधान सर्वांसाठी आहे आणि ते वंचित घटकांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. कार्यक्रमात अधिकारी, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. संविधान दिनाचे औचित्य साधत समाज जागृतीचे महत्त्व दोन्ही मान्यवरांनी पटवून दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

2 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

24 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago