महाराष्ट्र

शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला

मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2026 च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 ऐवजी 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) देखील 8 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सीटीईटी परीक्षेला बसणार असल्याने त्यांच्याकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचा दिवस बदलत नवीन तारीख 22 फेब्रुवारी 2026 जाहीर केली आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शाळांनी व परीक्षा केंद्रांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

5 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago