महाराष्ट्र

त्यांनी नौटंकी करण्याऐवजी त्यांच्या खासदारांनी लोकसभेच्या अधिवेशनात परराष्ट्र मंत्र्यांसमोर निषेध नोंदवावा

नकलाकार जितेंद्र आव्हाड यांचा स्टंटबाजी करणे हा स्थायीभाव…

मुंबई: जितेंद्र आव्हाड यांनी परराष्ट्र धोरणावर राज्याच्या विधानभवनात नौटंकी करण्याऐवजी लोकसभेच्या अधिवेशनात त्यांच्या खासदारांनी परराष्ट्र मंत्र्यांसमोर बेड्या घालून करावी असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी लगावला आहे.

दरम्यान नकलाकार जितेंद्र आव्हाड यांचा स्टंटबाजी करणे हा स्थायीभाव आहे असा थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी केला आहे.

लोकशाहीत आमचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवन परिसरात बेड्या घालून प्रवेश केला. याबाबतची बाईट पाहिली परंतु हाच मिडिया रोज विविध विषयांवर ठाणे येथे बंगल्यावर असो किंवा पक्ष कार्यालयात असो सातत्याने या सरकारच्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड ज्या – ज्या प्रतिक्रिया व्यक्त करतात या सर्वांना माध्यमे कव्हरेज देतात मग आवाज कसा दाबला जातो असा सवालही आनंद परांजपे यांनी उपस्थित केला आहे.

लोकशाहीत विरोधकांनी आपली सकारात्मक भूमिका मांडली पाहिजे. आणि नेहमी जितेंद्र आव्हाड मांडत असतात. पण आज मी काहीतरी स्टंट केला पाहिजे, काहीतरी मी वेगळा आहे हे दाखवले पाहिजे म्हणून हा खटाटोप होता मात्र दुर्दैव असे की, ही स्टंटबाजी करताना त्यांच्या पक्षाचा एक आमदारही सोबत नव्हता असा खोचक टोलाही आनंद परांजपे यांनी लगावला.

अमेरिकेहून भारतीय नागरिक पुन्हा भारतात पाठवले गेले. त्यांच्या हातात बेड्या होत्या. खरंतर देशाचे परराष्ट्र धोरण हे ना महाराष्ट्राच्या विधानभवनात, ना विधानपरिषदेत ठरते तर ते ठरते देशाच्या लोकसभेत आणि राज्यसभेत याची आठवण करून देताना आनंद परांजपे यांनी अमेरिकेतून आलेल्या भारतीयांना परत पाठवण्यात आले. याचा निषेध करायचा असेल तर लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन दुसर्‍या सत्रात सुरू होईल तेव्हा खासदारांनी बेड्या घालून निषेध नोंदवावा असेही आनंद परांजपे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

21 मिनिटे ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

4 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

4 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

4 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

5 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

6 तास ago