मुंबई: मराठी रंगभूमीच्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका, अभिनेत्री आणि प्रायोगिक रंगभूमीच्या अग्रणी विजया मेहता यांच्या निधनाने मराठी तसेच भारतीय रंगभूमीने एक मनस्वी कलावंत गमावला असून, त्यांच्या जाण्याने एका समृद्ध सांस्कृतिक पर्वाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सुनेत्रा पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, विजया मेहता यांनी आपल्या विलक्षण दिग्दर्शनशैली, सर्जनशील दृष्टी आणि रंगकलेप्रती असलेल्या अखंड निष्ठेच्या बळावर मराठी रंगभूमीला नवी दिशा दिली. प्रायोगिक रंगभूमीची चळवळ सक्षमपणे उभी करत त्यांनी मराठी नाट्यविश्व अधिक समृद्ध केले. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत आशय, शिस्त आणि कलात्मकतेचा उत्कृष्ट संगम अनुभवायला मिळत असे.
पुढे त्या म्हणाल्या की, विजया मेहता यांचे संपूर्ण आयुष्य रंगभूमी, कलासाधना आणि नव्या पिढीतील कलाकार घडविण्यासाठी समर्पित होते. त्यांचे कार्य, विचार आणि कलात्मक योगदान भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.विजया मेहता यांच्या निधनाने मराठी रंगभूमीची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली.
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…