महाराष्ट्र

महायुतीच्या वचननाम्यामध्ये जी – जी आश्वासने बळीराजाला देण्यात आली ती पूर्ण करण्याची जबाबदारी महायुतीची

मुंबई: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीच्या वचननाम्यामध्ये जी – जी आश्वासने महाराष्ट्रातील बळीराजाला देण्यात आली ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी महायुतीची आहे परंतु कालपासून खोडसाळपणे प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा कर्जमाफीला विरोध आहे अशाप्रकारची चर्चा होत असून हे अत्यंत चुकीचे असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे आहे.

गेले दहा दिवस अजित पवार हे राज्याचे अर्थ व वित्त नियोजन मंत्री म्हणून प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांसोबत, राज्यमंत्र्यांसोबत, सचिव, उपसचिव यांच्याशी बैठका घेऊन चर्चा करत आहेत. ज्यावेळी अजित पवार मार्चमध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडतील त्यावेळी पुढच्या वर्षीचा फायनान्सियल आऊटलेट काय असला पाहिजे. सन २४-२५ या मागील वर्षात झालेल्या घोषणा आणि त्याबाबत झालेले खर्चाचे नियोजन त्यात अधिक खर्च झालेला नाही याचा अत्यंत सूक्ष्मपणे प्रत्येक खात्याचा आढावा घेत आहेत असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

मार्चमध्ये जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल त्यावेळी महायुतीने आपल्या वचननाम्यामध्ये केलेल्या सर्व घोषणा पूर्ण झालेल्या पहायला मिळतील. बळीराजा हा कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही अशाप्रकारच्या बातम्या माध्यमप्रतिनिधिंनी चालवू नये असा सल्लाही आनंद परांजपे यांनी दिला आहे. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या इतर अनेक प्रश्नांना आनंद परांजपे यांनी उत्तरे दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

11 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

11 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

12 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

12 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

12 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

12 तास ago