शिरूर (अरूणकुमार मोटे): रांजणगाव मधून वडीलांशी घरात किरकोळ वाद झाल्याने रागाच्या भरात १२ वर्षीय आशियाना वहीद अन्सारी ही मुलगी दि. २३ रोजी सकाळी १०च्या दरम्यान घर सोडून निघून गेली होती. ती चा शोध घेऊन ती दुपारपर्यंत घरी परत न आल्याने तिच्या आईने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत मुलीचा शोध घेण्याकामी रडत रडत विणवणी केली. त्यानंतर लगेच सदर मुलीचा शोध घेण्या कामी तात्काळ तीन पथके नेमण्यात आली होती.. त्या आईच्या मातृत्वाचे दुख पाहून पो. कॉ. गणेश वाघ यांनी आपली कर्तव्यदक्षता दाखवून नेटवर्कच्या माध्यमातून तत्परतेने पुणे ग्रामीण व पुणे शहर हद्दीतील आजू बाजूच्या सर्व पोलीस स्टेशन ला तात्काळ कॉल केले असता येरवडा पोलीस स्टेशन येथे सदर मुलगी असल्याची माहिती प्राप्त झाली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण यांनी कार्यतत्पर राहून कर्तव्याशी प्रामाणिक असलेले पो .हवा. संदिप जगदाळे व महीला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी कौतुक केलेल्या पोलिस कॉन्टेबल महिला चालक शुभांगी लबडे यांना येरवडा पोलीस स्टेशन येथे मुलीला घेऊन येणे कामी तात्काळ रवाना केले.पोलीस स्टेशन येथे इतर तक्रारिंची लगबग चालू असताना देखील ठाणे अंमलदार मदतनीस पो कॉ. अजित पवार,अंमलदार जागृती मचिंदर , वायरलेस अंमलदार निशा हुंडेकर यांनी पीडितेच्या आईस धीर देऊन पोलिसांचा मातृत्वाविषयीं असलेला आदर दाखवून दिला. कर्तव्यदक्षतेची आणखी एक वेगळी चुणूक म्हणजे नाईट राऊंड पोलिस उपनिरीक्षक पासलकर व चालक पो. हवा माऊली शिंदे यांनी नाईट राऊंड ला रवाना होण्याऐवजी सदर मुलीचा शोध घेणेकामी सर्व परिसर पिंजून काढला. एका मातेला तिची मुलगी तातडीने कर्तव्य तप्तर राहून स्वाधीन केल्याने रांजणगाव पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी व अंमलदार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …