महाराष्ट्र

एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू…; अजितदादांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदेंची भावनिक आदरांजली

दादांची स्वप्ने पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली”; फडणवीसांच्या वाढदिवशी शिंदेंच्या भावना अनावर

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक शब्दांत त्यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि अजितदादा पवार यांच्या आठवणींचे दुःख अशा संमिश्र भावनांनी आजचा दिवस भरून गेल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले.

“आजचा दिवस एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू घेऊन आला आहे. अजितदादांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. त्यांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर चालत सुखी, समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना बळ मिळो, हीच प्रार्थना,” असे शिंदे म्हणाले.

अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचे स्मरण करताना त्यांनी कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते, वक्तशीरपणा, जनतेसाठी झटण्याची वृत्ती आणि प्रशासनावरील प्रभावी पकड यांचा विशेष उल्लेख केला. अर्थमंत्री म्हणून महायुतीच्या वचनपूर्तीसाठी त्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प तसेच शेती, शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील त्यांचा अभ्यास महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राच्या विकासाची अनेक स्वप्ने आम्ही एकत्र पाहिली होती. मात्र नियतीने दादांना अकाली हिरावून नेले. त्यामुळे त्यांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करणे, हीच त्यांच्याप्रती खरी आदरांजली ठरेल, असेही शिंदे यांनी सांगितले.

आपल्या श्रद्धांजली संदेशाचा समारोप करताना त्यांनी भावनिक ओळींमधून अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

“दिवस येतील-जातील, कालचक्र फिरत राहील…

दादांच्या स्मृतींचा सुगंध सदैव दरवळत राहील.”

महायुतीतील सहकार्य, विकासाची समान दृष्टी आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

14 मिनिटे ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

17 मिनिटे ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

1 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

6 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

6 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

6 तास ago