महाराष्ट्र

तात्या झाले जिवंत! रुग्णवाहिका खड्ड्यातून गेली अन् मृतदेहाची हालचाल सुरू झाली…

कोल्हापूर: कोल्हापुरात एका वृध्द व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवासी पांडुरंग ऊर्फ तात्या उलपे यांना रुग्णालयाने मृत घोषित केले. अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक, मित्रपरिवार जमा झाले होते. सर्व जण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते, पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंग तात्यांची हालचाल सुरू झाली.

कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी ही घटना घडली आहे. वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उलपे यांना पंधरा दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पांडुरंग तात्या यांचे नातेवाईक घरी जमा झाले. अंत्यविधीची तयारी सुरू झाली. रुग्णालयातून पांडुरंग तात्या यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला. त्याच वेळी पांडुरंग तात्या यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली. नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेले. यानंतर तात्या आपल्या पायावर उभा राहून घराकडे चालत आलेत. ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचे नातेवाईक सांगत आहेत.

पांडुरंग उलपे यांनी नातवांच्या, शेजाऱ्यांच्या आणि पांडुरंगाच्या कृपेमुळे मला जीवनदान मिळाल्याचे सांगतात. पांडुरंग उलपे हे कोल्हापुरातील कसबा बावडा येथे राहत असून त्यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. पुढच्या काही दिवसात ते विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन देवाला अभिषेक घालणार असल्याचे त्यांच्या पत्नीने यावेळी सांगितले.

दरम्यान, पांडुरंग उलपे यांच्यावर रुग्णालयात १५ दिवस उपचार केल्यानंतर आज अशा घटनेनं ते घरी परतले. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना कोल्हापूरमध्ये घडल्यान देवांनी त्यांना परत पाठवले, अशी चर्चा कोल्हापुरात सुरू आहे.

हार्ट अटॅकपासून वाचवते आंबट-गोड ‘चिंच’; इम्युनिटी मजबूत- कॅन्सरचा धोका होईल कमी

Video : निघोज येथील रांजण खळगे एक निसर्गाचा चमत्कार!

Video: अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिला…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

12 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

12 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

13 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

18 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

18 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

18 तास ago