funeral-viral

Video: अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिला…

देश

नवी दिल्ली : अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

अंत्यसंस्कारासारखा वाटणारा हा एक आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. जो पाहिल्यावर सर्वांना धक्का बसला आहे. एक मृतदेह ज्याच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत. एक व्यक्ती चितेवर आहे. चितेला अग्नी देण्यात आला आणि त्याचवेळी मृतदेह चितेवर उठून बसला. त्यानंतर चितेवर उभा राहून तो पळू लागला. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित लोकांना घाम फुटला. संबंधित दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

व्हिडीओत पाहायला मिळते की, अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची गर्दी जमली आहे. तिथं लाकूड पेटवेले आहेत, जे चितेसारखं दिसतं आहे. त्यावर एक व्यक्ती बसलेली आहे. ती चितेवरून उठते आणि पळताना दिसते. चितेवरील व्यक्ती जणू मृतदेहच आहे आणि ती जिवंत झाली असे वाटते. पण व्हिडीओ तुम्ही नीट पाहिला तर या व्यक्तीच्या अंगावर कपडे आहेत. हिंदू प्रथेनुसार मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना त्याच्यावर कफन घातले जाते, बाकी त्याच्या अंगावर कोणतेही कपडे नसतात. पण या व्हिडीओत मात्र या व्यक्तीने कपडे घातलेले आहेत.

दरम्यान, संबंधित व्हिडीओ फक्त व्हायरल व्हिडीओ म्हणून दाखवण्यात आला की खरंच घटना घडली आहे. व्हिडीओचं नेमकं सत्य काय? त्याबाबत अधिकृत माहिती हाती आलेली नाही.

Live Video:स्टेजवर हनुमानाची भूमिका करताना प्रभू श्रीरामांच्या चरणी सोडला प्राण…

Video: नागाच्या जवळ जाऊन काढत होता व्हिडिओ अन्…

Video: भला मोठा लांब किंग कोब्रा आणि अजगराची झुंज…

Video: हा माणूस जुगाडचा बाप ठरला….

Video: रुग्णालयात भुताटकी? रात्रीच्यावेळी लाकडी शिडी लागली आपोआप चालू…