पोलादपूर: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 75 वर्षे होऊनही कोकणातील कुणबी समाज उपेक्षितच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी तसेच समाज संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने आता कुणबी जोडो अभियानाला सुरुवात झाली आहे. कुणबी जोडो अभियानातून रायगडमध्ये कुणबी समाज एकटवला आहे. महाड तालुक्यात काळ हजारोंच्या संख्येने समाजबांधव एकत्र आले.
डिसेंबर 2022 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून कोकणातील कुणबी जोडो अभियानाची सुरुवात झाली आहे. मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघ या शतकोत्तरी वाटचाल केलेल्या मातृसंस्थेच्या वतीने, 8 जानेवारी रोजी महाड पोलादपूर तालुक्यातील बारा ते पंधरा हजार कुणबी समाजबांधव एकत्र आले होते. महाड तालुक्यातील पाचाड गावी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅली काढली गेली. लोकनेते माजी आमदार स्व. शांताराम फिलसे यांच्या जन्मभूमी चिंभावे गावी तालुकास्तरीय कुणबी जोडो अभियान रॅलीचा समारोप झाला.
कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली, कुणबी राजकीय संघटन समिती अध्यक्ष अशोक वालम यांच्या प्रयत्नातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई नवी मुंबई, मुंबई उपनगर क्षेत्रात कुणबी जोडो अभियान राबविले जात आहे. महाड-पोलादपूर तालुकाध्यक्ष अनंत गवळकर यांच्या पुढाकाराने 8 जानेवारी रोजी तालुक्यातील 9 गट आणि हजारोंच्या संख्येने कुणबी समाज बांधव-भगिनी अभियानात सहभागी झाले. कुणबी समाजोन्नती मंडळ महाड-पोलादपूर मध्यवर्ती अध्यक्ष प्रदीप लोखंडे, सरचिटणीस प्रकाश तरळ, कोषाध्यक्ष संभाजी काजरेकर, कुणबी युवा संघाचे सहसचिव मिलिंद चिबडे आदींनी या अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…