jategaon-scholarship-student
शिक्रापूरः जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री. संभाजीराजे माध्यमिक विद्यालयातील १० विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले आहेत, अशी माहिती प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली.
विद्यालयातील जिल्हास्तरीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे –
आर्या सचिन तुपे (२४६)
साक्षी सचिन इंगवले (२३४)
प्रणय दत्तात्रेय मासळकर (२३०)
आदित्य प्रभाकर भिसे (२२४)
श्रीनाथ सुभाष बगाटे (२२०)
विश्वजीत राहुल सातपुते (२१०)
गौरी नवनाथ उमाप (२०२)
आयुष मच्छिंद्र उमाप (१९६)
प्रणव तुकाराम गायकवाड (१९२)
अनिरुद्ध अशोक निकाळजे (१८४ )
या सर्व विद्यार्थ्यांना शंकर भुजबळ, रमेश जाधव, कांतीलाल धुमाळ, अनिता तांबे, प्रिया उमाप या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष सुगंधराव उमाप व सचिव प्रकाश पवार यांनी अभिनंदन केले आहे.
शिरूर तालुका अव्वलस्थानी…
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यातून २२७९५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४१५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण १०९४ मुले शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. त्यापैकी शिरूर तालुक्यातील सर्वाधिक २२४ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. तसेच इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेस जिल्हयातील एकूण ४०९२४ मुले परीक्षेस प्रविष्ट झाली. यापैकी ११ हजार ७०० मुले उत्तीर्ण झाली. एकूण १२०३ मुले शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत.
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत शिरूर तालुक्यातील सर्वाधिक ३७४ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले असून तालुका अव्वल स्थानी आहे ही बाब गौरवास्पद असल्याचे शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष रामदास थिटे यांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना सांगीतले.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…