महाराष्ट्र

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मला फॉलो केल; अशोक सराफ यांचा खुलासा म्हणाले…

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. विनोदी असो वा गंभीर भूमिका, त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या खास शैलीत जिवंत केली. त्यांच्या समकालीन आणि तितक्याच लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी मनमोकळेपणाने भाष्य केले. ते म्हणाले, “लक्ष्या एक अत्यंत टॅलेंटेड आर्टिस्ट होता. कोणताही बॅकग्राऊंड नसताना त्याने आपल्या मेहनतीवर करिअर घडवलं. लहान-लहान भूमिका करत तो पुढे आला, हे त्याचं मोठं यश आहे.”

यावेळी सराफ यांनी एक महत्त्वाचा दावा करत म्हटलं की, “त्याने केलेले अनेक रोल पाहिले तर ते माझ्या शैलीला फॉलो केल्यासारखे वाटतात. अर्थात त्याची स्टाईल वेगळी होती, पण टायमिंग साधारण सारखंच होतं.” त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा दोघांच्या जोडीबद्दल चर्चा रंगली आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या विनोदी भूमिका साकारल्या. मात्र एक होता विदूषक या चित्रपटातील त्यांच्या गंभीर भूमिकेनेही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तरीही सराफ यांच्या मते, “त्याने कॉमेडीच्या पलीकडे फारशी व्हरायटी केली नाही. तो कॉमेडीतच अधिक रमला.”

दोघांनी मिळून सुमारे ५० चित्रपटांत एकत्र काम केल्याचे सांगत सराफ म्हणाले की, “अनेक चित्रपटांत मी हिरो असायचो आणि तो भाऊ, ड्रायव्हर किंवा सहाय्यक भूमिकेत असायचा. आमच्या दोघांची वेगळी स्टोरी सिनेमात असायची. त्या काळात आम्ही प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणलं.”

मराठी चित्रपटसृष्टीतील ही गाजलेली जोडी आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अकाली निधनानंतरही त्यांच्या आणि अशोक सराफ यांच्या चित्रपटांचा प्रभाव आजही तितकाच कायम आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

24 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

24 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago