महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ! महायुतीत तणाव; मंत्री भरत गोगावले यांचा भाजप-राष्ट्रवादीला थेट इशारा

रायगड: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी घडामोड रायगड जिल्ह्यातून समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीतील तणाव उघडपणे समोर येऊ लागला असून, महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना थेट इशारा दिला आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवत भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना गोगावले यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “महायुतीत एकत्र आहोत तर स्थानिक पातळीवरही एकत्र येणे गरजेचे आहे. जर तसे झाले नाही, तर भविष्यात लोकसभा, विधान परिषद आणि इतर निवडणुकांबाबत वेगळा विचार करावा लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. निवडणुका पार पडल्या असल्या तरी काही जिल्ह्यांत वाद कायम असल्याचे दिसून येत आहे. रायगडमध्ये तर हा वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.“त्यांना आमची गरज नसेल, तर त्याचाही विचार केला जाईल. महायुतीत आहोत तर एकत्र राहणे आवश्यक आहे,” असे स्पष्ट मत गोगावले यांनी मांडले.

पालकमंत्रिपदावरही सूचक प्रतिक्रिया

रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत विचारले असता गोगावले यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. “देवाच्या मनात आल्यावर काय होणार नाय,” असे म्हणत त्यांनी थेट भाष्य टाळले. महाड येथील छबिना उत्सवादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

गेल्या काही वर्षांपासून पालकमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू असताना गोगावले यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

रायगडमधील या घडामोडींमुळे राज्यातील महायुतीतील अंतर्गत तणाव अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

7 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago