महाराष्ट्र

संगमनेर निकालावर कायदेशीर घोंगडी! अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

SLP फेटाळली; शपथपत्रातील माहिती लपविल्याच्या आरोपांवर मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा

मुंबई: संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या कायदेशीर घडामोडीत सर्वोच्च न्यायालयाने आमदार अमोल खताळ यांनी दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (SLP) फेटाळून लावली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवरील नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेल्या याचिकेत अमोल खताळ यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या शपथपत्रात शासकीय कराची थकबाकी तसेच ‘नीलकमल’ भागीदारी संस्थेतील भागीदार असल्याची माहिती जाणीवपूर्वक लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारणावरून खताळ यांचे नामनिर्देशन अवैध ठरवून त्यांची निवड रद्द करावी आणि थोरात यांना विजयी घोषित करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

या याचिकेला विरोध करत अमोल खताळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका चालविण्यास कोणतेही वैध कारण नसल्याचा दावा करत ती प्रारंभीच फेटाळून लावण्याची मागणी केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत याचिका सुनावणीस पात्र असल्याचे स्पष्ट केले.

या आदेशाला आव्हान देत खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. शासकीय कराची थकबाकी अत्यल्प असल्याने ती निवडणूक याचिकेचा आधार ठरू शकत नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत शासकीय देयकाची रक्कम कितीही कमी असली, अगदी एक रुपयाची असली तरी ती निवडणूक शपथपत्रात नमूद करणे बंधनकारक असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले.

या निर्णयामुळे आता मुंबई उच्च न्यायालयात मूळ निवडणूक याचिकेवरील नियमित सुनावणी सुरू होणार असून, अमोल खताळ यांची निवड रद्द करून बाळासाहेब थोरात यांना विजयी घोषित करण्याच्या मागणीवर अंतिम निर्णय उच्च न्यायालय घेणार आहे, अशी माहिती ॲड. अमित करंडे यांनी दिली.बाळासाहेब थोरात यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मुकुल रोहतगी, ॲड. शिवाजी जाधव आणि ॲड. अमित करंडे यांनी बाजू मांडली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

17 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

17 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

17 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago