महाराष्ट्र

पुणे शहरातील निर्जन आणि अंधाऱ्या २७४ ठिकाणी प्रकाश व्यवस्था सुधारणा

पुणे: पुणे शहरातील निर्जन आणि अंधाऱ्या २७४ ठिकाणी प्रकाशव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या पोलिसांच्या विनंतीनुसार, पुणे महानगरपालिकेने तातडीने कार्यवाही करून नवीन पथदिवे बसवण्याचे आणि अक्षम पथदिव्यांचे दुरुस्तीकरण करण्याचे काम पूर्ण केले आहे. या उपक्रमामुळे रात्रीच्या वेळी सुरक्षा वृद्धी होईल आणि शहरातील निर्जन भागांमध्ये प्रकाशाची सोय निर्माण होईल. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी १ जानेवारी रोजी दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने ही कार्यवाही अंमलबजावणी केली असून, पुढील व्यवस्थेची ग्वाही पत्राद्वारे देखील दिली आहे. यामुळे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डॉ. राजेंद्र भोसले (महानगरपालिका आयुक्त), उपायुक्त (परिमंडळ कार्यालय क्रमांक २), व श्री अविनाश सकपाळ यांचे आभारही मानले.

शहरातील प्रमुख भागांमध्ये कार्यवाही 

महापालिकेच्या परिमंडळ कार्यालय क्रमांक २ अंतर्गत शिवाजीनगर-घोलेरोड, कोथरूड-बावधन आणि औंध-बाणेर या तीन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रकाश व्यवस्था सुधारण्याचे काम करण्यात आले. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करून आणि नवीन पथदिवे बसवून प्रकाश यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रातील कामे

डेंगळे पुलाखाली नवीन पथदिवे बसवून प्रकाशयोजना

पाटील इस्टेट परिसरातील ब्रिजवर ब्रेकेट लावून उजेड

आपटे रस्त्यावर आणि रामोशीवाडी परिसरात नवीन पथदिवे

वाकडेवाडी, जनवाडी, पांडवनगर येथे बंद दिवे सुरू

कोथरूड-बावधन क्षेत्रातील कामे

सार्थ शिल्प सोसायटी, एकलव्य कॉलेज, परमहंस नगर येथे पथदिवे बसवून प्रकाश व्यवस्था

गोपीनाथ नगर, परांजपे शाळा ते कमिन्स कंपनी मागील गेट, शिंदे नगर लेन नं. ३ येथे पथदिवे

चांदणी चौक बस स्टॉप, कोथरूड डेपो, ARAI रोड येथे नवीन पोल

औंध-बाणेर क्षेत्रातील कामे

पाषाण-सुतारवाडी, बालेवाडी, पाषाण जलशुद्धीकरण केंद्र परिसरात प्रकाशयोजना

महादेव वाडी, सुसरोड, भाऊ पाटील रोड येथे उजेड

संजय गांधी लमाणतांडा वसाहत, बोपोडी-आदर्शनगर स्मशानभूमी येथे सीसीटीव्ही आणि प्रकाशयोजना

नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल

पुणे महानगरपालिकेने आधीपासून असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती केली. ज्या ठिकाणी अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाही, तिथे लवकरच ते बसवले जाणार आहेत. या उपाययोजनांमुळे पुणे शहरातील निर्जन ठिकाणी सुरक्षितता वाढेल. विशेषतः महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे उपक्रम उपयुक्त ठरणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कच्चा खावा की भाजून खावा

लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक…

11 मिनिटे ago

ग्रामीण-शहरी वाद नव्हे, तरुणाईच्या एकतेतूनच घडेल सक्षम महाराष्ट्र; दिनेश शिंदे

मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या…

37 मिनिटे ago

कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; बिगर-काश्मिरी मजुरावर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…

53 मिनिटे ago

सिंहस्थातून घडणार पुढील १०० वर्षांचा नाशिक; ३२ हजार कोटींच्या विकास आराखड्याची शिंदेंची घोषणा

स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…

56 मिनिटे ago

जनतेच्या विश्वासाचा सन्मान करत महायुती सरकार स्थापन; विकासालाच प्राधान्य; दिनेश शिंदे

२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…

1 तास ago

अण्णाभाऊ साठे जयंतीकडे सांस्कृतिक विभागाची पाठ?; विशेष कार्यक्रम नसल्याने कलाक्षेत्रात नाराजी

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा…

1 तास ago