महाराष्ट्र

लहानग्या विराटला ‘शिंदे काकां’चा दिलासा; विनामूल्य शस्त्रक्रियेमुळे पुन्हा खुलले हास्य

ठाणे : सातारा जिल्ह्यातील मुनावळे गावातील ८ वर्षीय विराट भोसलेच्या मदतीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde धावून आले आहेत. जन्मतः नाक आणि घशात गाठ असलेल्या विराटवर ठाण्यात विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आली असून उपचारानंतर त्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

मुनावळे गावातील विराटच्या नाकात आणि घशात जन्मापासूनच गाठ होती. वय वाढत गेले तसे या गाठींचा आकारही वाढत गेला. त्यामुळे रात्री झोपताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. साताऱ्यातील रुग्णालयात तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रियाच एकमेव उपाय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र या शस्त्रक्रियेसाठी सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. विराटचे वडील विष्णू भोसले आणि आई मनीषा भोसले यांना हा खर्च परवडणारा नव्हता.

दरम्यान, शिंदे दरे गावात विश्रांतीसाठी गेलेल्या भोसले कुटुंबीयांनी आपली व्यथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली. हा आजार काहीसा वेगळा असल्याने सरकारी योजनांमधून मदत मिळण्यात अडचणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले. परिस्थिती समजताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ ठाण्यातील Siddhivinayak Hospital येथील डॉ. अमोल गित्ते यांच्याशी संपर्क साधून विराटवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संपूर्ण खर्च आपण उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर विराटला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर डॉ. कौस्तुभ मेहता यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. काही दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू ठेवल्यानंतर अखेर विराटला घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी विराटचे वडील विष्णू भोसले यांनी रुग्णालयाचे संचालक डॉ. अमोल गित्ते, डॉ. कौस्तुभ मेहता आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानले. तसेच आपल्या मुलाच्या मदतीला तत्काळ धावून आल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही भोसले कुटुंबीयांनी मनापासून आभार व्यक्त केले.

अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीला नेहमीच पुढे असणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळीही संवेदनशीलतेचा प्रत्यय देत लहानग्या विराटच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

1 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

1 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

17 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago