महाराष्ट्र

इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या कर्मचाऱ्यांना ‘दादाचा वादा’…

दादा, दिलेला शब्द पाळतो! गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन प्रश्न लावणार मार्गी

मुंबई: इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत वरळी डोम येथे बैठक घेऊन आपल्या समस्या मांडल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे नेते अर्जुन टिळे यांच्यासमवेत आलेल्या इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या शिष्टमंडळातील कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचे गार्‍हाणे अजितदादांसमोर मांडले. यावेळी अजितदादा पवार यांनी आपल्या समस्या मुद्देसूद माझ्याकडे द्या, त्या सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच दिल्लीत भेट घेऊन तुमच्या समस्या लवकरात लवकर सोडवेन असा शब्द झालेल्या बैठकीत दिला.

यावेळी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, नाशिक येथील राष्ट्रवादीचे नेते अर्जुन टिळे, डॉ. जाकीर शेख, राजेश बेंस, इंडिया सिक्युरिटी प्रेसचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धुंदरे, जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

8 तास ago

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

8 तास ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

1 दिवस ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

1 दिवस ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

1 दिवस ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

1 दिवस ago