महाराष्ट्र

लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला राहुल गांधी, खर्गेंची दांडी; बैठक व्यवस्थेवर नाराजी

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. या राष्ट्रीय सोहळ्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, दोन्ही नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.

काँग्रेसच्या या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी लाल किल्ल्यावरील सोहळ्याला गैरहजर राहण्यामागील कारण आता समोर आले आहे. ‘आज तक’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे हे सोहळ्यातील बैठक व्यवस्था आणि प्रोटोकॉलवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षनेत्याला पहिल्या रांगेत स्थान देण्याची परंपरा आहे. मात्र, यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासाठी पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले नसल्याचे वृत्त आहे.

गेल्या वर्षी, 2024 मध्येही राहुल गांधी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी लाल किल्ल्यावर उपस्थित होते. त्यावेळी त्यांना चौथ्या रांगेत स्थान देण्यात आले होते. या बैठक व्यवस्थेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देताना ऑलिम्पिक खेळाडूंसाठी करण्यात आलेल्या विशेष बैठक व्यवस्थेमुळे आसन व्यवस्थेत बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

दरम्यान, लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यानंतर काँग्रेसने दिल्लीतील पक्ष कार्यालयात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी उपस्थित होते.

यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या भाषणातून काँग्रेस ‘Gen-Z’च्या मागे ठामपणे उभी राहील, असे सांगितले. तर राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

“आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, हे केवळ एक भेट नसून आपली जबाबदारी आहे,” असा संदेश राहुल गांधी यांनी दिला. सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणे, संविधान आणि तिरंगा हृदयात ठेवणे तसेच लोकशाहीचे रक्षण करणे हीच या स्वातंत्र्याची खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

5 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

5 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

21 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago