तुळजापूर: नवरात्र उत्सवानिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांचे दुःख हलके व्हावे, त्यांचे प्रश्न त्वरित मार्गी लागावेत आणि योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी त्यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील लेकरं सुरक्षित राहावीत, त्यांना योग्य शिक्षण मिळावे, शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच माझी प्रार्थना आहे. शेतकरी आत्महत्येच्या मार्गाला जात आहेत, त्यांना या संकटातून बाहेर पडण्यासाठी शक्ती आणि धैर्य लाभावे, अशी विनंती मी आईकडे केली.”
तसेच त्यांनी महायुती सरकारच्या संवेदनशील कामकाजाचे कौतुक केले. “पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही दिलासादायक बाब आहे,” असे त्या म्हणाल्या.
या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जिल्हा प्रमुख भारती गायकवाड, अर्चना दराडे, जिल्हा संघटक किरण ताई निंबाळकर, तालुका प्रमुख माया चव्हाण, तालुका प्रमुख (कळंब) आशा अव्हाड, शहर प्रमुख महादेवी माळी आदी मान्यवरांचा समावेश होता.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…