मुख्य बातम्या

शिरुर; मनरेगा गैरव्यवहाराचा खोटा आरोप…? देशमुखांचा पवारांवर पलटवार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) भांबर्डे (ता. शिरुर) येथे मनरेगा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा मच्छिंद्र बापूराव पवार यांनी आमच्यावर खोटारडा आरोप केला आहे. तसेच हे आरोप खोडसाळ आणि निराधार असुन त्यांनी दिशाभुल केली असल्याचे प्रदीप सुरेश देशमुख यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले.

देशमुख म्हणाले, “गट नं. ६१७ ची मी स्वतःच्या खर्चाने मोजणी करून घेतली. त्यावेळी मच्छिंद्र पवार यांच्यासह गावातील १५ व्यक्ती उपस्थित होत्या. त्यावेळी गावकऱ्यांसमोर ती मोजणी मान्य असल्याचे पवार यांनी तोंडी सांगितले. पण काही दिवसातच पलटी मारत त्यांनी आमच्या विरोधात शिरुर येथे पंचायत समितीच्या कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला. विहिरीचे काम सुरु असताना ते गप्प बसले. पण काम संपल्यावर त्यांनी आमच्यावर खोटेनाटे आरोप करुन गावाची दिशाभुल केली.

प्रदीप देशमुख पुढे म्हणाले, माझ्या आज्जीच्या श्राद्धकाळातदेखील तसेच विजयादशमीच्या दिवशी गावभर आमची बदनामी झाली. पवार यांचा आम्हाला जाणूनबुजून छळण्याचा हेतु असुन केवळ वैयक्तिक सूड म्हणून हा सर्व प्रकार सुरु आहे. तसेच ग्रामसेवक, रोजगार सेवक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणात ओढुन त्यांची प्रतिमा मलिन केली जात आहे.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले, गट नं. ४७, ६२२ व ६२० या जमिनी आमच्या कायदेशीर मालकीच्या आहेत. तरीसुद्धा उपोषणकर्ते मच्छिंद्र पवार हे खोटे आरोप करुन मला व माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास देत आहेत. पवार यांनी विनाकारण सामाजात आमची बदनामी थांबवावी अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्ग अवलंबवावा लागेल.

शिरुर तालुक्यात मनरेगा योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; उपोषणाचा इशारा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

11 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago