महाराष्ट्र

मराठी भाषा संवर्धनासाठी ठोस पावले उचलणार; मंत्री उदय सामंत

मा. राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना ‘कलारत्न’ पुरस्कार प्रदान

पुणे: मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आयोजित विश्व मराठी संमेलन २०२५ चा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अभिनेते रितेश देशमुख, अभिनेते सयाजी शिंदे, साहित्यिक सदानंद मोरे, उल्लासदादा पवार, लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे, राजेश पांडे, रवींद्र शोभणे आदी मान्यवर उपस्थित होते.

समारंभात मा. राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना “कलारत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना रितेश देशमुख यांनी मराठी कला आणि सिनेविश्वातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

राज ठाकरे यांचे साहित्यिकांना मार्गदर्शनाचे आवाहन

यावेळी बोलताना मा. राज ठाकरे म्हणाले, पूर्वी साहित्यिक राजकीय आणि सामाजिक विषयांवर स्पष्ट मत मांडत असत. मात्र, आज तसे दिसत नाही. केवळ पुस्तके लिहून उपयोग नाही, तर साहित्यिकांनी समाजाला मार्गदर्शन केले पाहिजे. मराठी पुस्तकांमधील ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राने पुढे जाणे गरजेचे आहे.”

मराठी भाषा संवर्धनासाठी ठोस पावले उचलणार; मंत्री उदय सामंत

यावेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, “राज साहेबांच्या हस्ते रितेशचा सत्कार व्हावा, ही आमची इच्छा होती. आज व्यासपीठावरून राज साहेबांचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी विशेष क्षण आहे. मराठीच्या भल्यासाठी आणि संवर्धनासाठी ज्या काही सूचना येतील, त्या पूर्ण करण्याची ग्वाही मी मराठी भाषा मंत्री म्हणून देतो.”

पुणेकरांची उत्स्फूर्त उपस्थिती 

या भव्य संमेलनाच्या सांगता सोहळ्यास हजारो पुणेकरांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी हा सोहळा निश्चितच प्रेरणादायी ठरला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

5 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

5 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

5 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

6 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

6 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

19 तास ago