महाराष्ट्र

अमर रहे… अजितदादा अमर रहे! बाणगंगा तलावात विधीपूर्वक अस्थींचे विसर्जन

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज वाळकेश्वर येथील पवित्र बाणगंगा तलावात विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले.यावेळी “अमर रहे… अमर रहे… अजितदादा अमर रहे…” अशा भावनिक घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक, कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, आमदार सना मलिक शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, संजय तटकरे, मुंबई उपाध्यक्ष कप्तान मलिक, प्रदेश सरचिटणीस नरेंद्र राणे, जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, अजय विचारे, इंद्रपाल सिंग, सुरेश भालेराव, महिला अध्यक्षा आरती साळवी, कार्याध्यक्षा मनिषा तुपे, ओबीसी सेलचे मुंबई अध्यक्ष बबन मदने, सहकार सेलचे मुंबई अध्यक्ष नंदकुमार काटकर, मुंबई सरचिटणीस दिपक पारडीवाला यांच्यासह पक्षाचे प्रदेश, मुंबई पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, महिला पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील कार्याची आठवण ठेवत त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

3 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

7 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

7 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

7 तास ago