महाराष्ट्र

महाराष्ट्र अधिक आनंदी, समृद्ध, प्रगतिशील होवो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विघ्नहर्ता गणरायाचरणी साकडे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

मुंबई: “श्रीगणरायांच्या कृपाशीर्वादाने महाराष्ट्र अधिक आनंदी, समृद्ध आणि प्रगतिशील होवो,” अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी केली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी गणेश भक्तांसह राज्यातील सर्व जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

“संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव हा केवळ धार्मिक वा सांस्कृतिक पर्व राहिलेला नाही, तर तो लोकसहभाग, लोकजागृती आणि सामाजिक एकात्मतेचा उत्सव झाला आहे. यंदा महायुती सरकारने गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्राचा राज्योत्सव’ म्हणून मान्यता दिली आहे. या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार असून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.गणेशोत्सव हा समाजाला एकत्र ठेवण्याचा, बांधिलकी जपण्याचा आणि एकोप्याची भावना दृढ करण्याचा उत्सव आहे. कुटुंब, मित्र, नातेवाईक, एकमेकांच्या सोबतीने आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने हा सण आपण साजरा करावा. त्याचबरोबर शिस्त व नियमांचे पालन करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे भान ठेवावे. सर्वांनी सामाजिक एकोप्याची परंपरा जपत सौहार्द व ऐक्याने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.”

श्रीगणरायांच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या शिवारात पिकांची समृद्धी, घराघरात सुख-समाधान आणि समाजात सकारात्मकतेचे बळ निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करत, प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल श्रीगणरायांच्या कृपाशीर्वादाने अधिक वेगवान व फलदायी होईल, अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

4 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago