महाराष्ट्र

मंत्री संजय शिरसाट पुन्हा अडचणीत…

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे नव्या घोटाळ्याच्या चक्रव्युहात अडकलेत.. शिरसाट यांच्या खात्याने ऊसतोड कामगारांसाठी राबवण्यात येणाऱ्या गोपिनाथ मुंडे कामगार कल्याण महामंडळात तब्बल 22 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय..एवढंच नाही तर विजय कुंभार यांनी कथित घोटाळ्याची मोडस ऑपरेंडीच सांगितलीय.

2019 मध्ये गोपिनाथ मुंडे ऊसतोड विकास महामंडळाची स्थापना केली.. त्यानुसार ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन त्यांना आयकार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला..त्याबाबत ग्रामसेवकांना जबाबदारी दिली.. त्यांनी फॉर्म तयार करुन ऊसतड कामगारांना ओळखपत्रं दिले… त्याची माहिती सरकारकडे आहे… असं असताना 6 जून 2025 ला पुन्हा एकदा 12 लाख 50 हजार ऊसतोड कामगारांचं सर्व्हेक्षण, नोंदणी आणि ओळखपत्रं वाटपासाठी स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला काम दिलं… त्यासाठी 21 कोटी 98 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या प्रत्येक ओळखपत्रासाठी 175 रुपये 84 पैसे निश्चित करण्यात आले.

जे टेंडर प्रक्रियेचे नियम अस्तित्वात नाहीत त्याचा भास करुन पूर्ण झालेल्या कामाचं पुन्हा टेंडर काढून पैसे उकळल्याचा आरोप विजय कुंभार यांनी मंत्री शिरसाट यांच्यावर केलाय.

कुंभार यांनी केलेल्या आरोपासंर्दभात संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कुठलीच प्रतिक्रिया मिळालेली नाही.

खरंतर संजय शिरसाट यांच्यावर आरोपांची ही पहिलीच वेळ नाही.. याआधीही शिरसाट वेगवेगळ्या आऱोपांमुळे अडचणीत आलेत…

शिरसाटांवरील आरोप कोणते?

विट्झ हॉटेल खरेदी गैरव्यवहार प्रकरण

शेंद्रा MIDCतील ट्रक टर्मिनन्सची जागा लाटल्याचा आरोप

5 हजार कोटींच्या सिडको जमीन घोटाळ्याचा आरोप

घरात पैशांच्या बॅगा आढळल्याचा आरोप

विजय कुंभार यांनी केलेल्या आरोपामुळे सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दूध का दूध आणि पानी का पानी करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..तसंच सतत होणाऱ्या आरोपांमुळे शिरसाट यांचा पाय खोलात चाललाय, हे मात्र निश्चित…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

9 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago