महाराष्ट्र

मंत्रालयातील कंत्राटी कामगारांना सहा महिने पगार नाही, त्यांची देणी तातडीने द्या…

मुंबई: मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या 6 महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी तातडीने द्यावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत केली आहे.

याशिवाय मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे पास बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. मंत्रीमंडळात मंत्र्यांची संख्या कमी असून एक – एक मंत्री 6 ते 7 खाती सांभाळत आहे तर 5-6 जिल्ह्यांना एक पालकमंत्री आहे. यामुळे कामे अतिशय धीम्या गतीने होत आहेत. याशिवाय मंत्री देखील क्वचितच मंत्रालयात उपलब्ध असतात याबाबत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून या कामगारांना न्याय द्यावा अशी विनंतीही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

2 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

2 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

2 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

2 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

7 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

8 तास ago