शिरपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होऊ देणार नसून अनुदानित आदिवासी आश्रमशाळांसमोरील प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार Satyajeet Tambe यांनी दिली. शिरपूर येथे आयोजित नाशिक विभागातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा संस्थाचालकांच्या बैठकीत ते बोलत होते.
महाराष्ट्र अनुदानित आदिवासी आश्रमशाळा चालक संस्थेच्या वतीने आयोजित या बैठकीत आश्रमशाळांसमोरील आर्थिक, प्रशासकीय आणि शैक्षणिक अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शासनाच्या विविध आदेशांमुळे निर्माण झालेल्या समस्या, निधी वितरणातील अडथळे, आवश्यक सुविधांचा अभाव आणि दैनंदिन कामकाजातील अडचणी यावर संस्थाचालकांनी आपली मते मांडली.
यावेळी आमदार तांबे यांनी संस्थाचालकांच्या समस्या ऐकून घेत या सर्व प्रश्नांना येत्या पावसाळी अधिवेशनात शासनासमोर ठामपणे मांडण्याचे आश्वासन दिले. आदिवासी मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी आश्रमशाळांना सक्षम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीस माजी खासदार Bapu Chaure, शिवराम झोले, पोपटराव सोनवणे, युवराज पाटील, राजेंद्र सरोदे, तुषार रंधे, डॉ. शशिकांत वाणी यांच्यासह नाशिक विभागातील विविध संस्था प्रमुख आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बैठकीत आश्रमशाळांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शासनाने संवेदनशील भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…