मुख्य बातम्या

नियमांना हरताळ? दावडी निमगावात कंपनीचे काळे प्लास्टिक जाळल्याचा गंभीर प्रकार

नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणाला धोका

दावडी निमगाव (अक्षय टेमगिरे): खेड तालुक्यातील दावडी निमगाव हद्दीतील लोणकरवाडी परिसरात एका इसमाने कंपनीमधील काळ्या प्लास्टिकचा साठा उघड्यावर जाळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पर्यावरणालाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाने कंपनीतील वापरात असलेले काळे प्लास्टिक व इतर कचरा उघड्या जागेत पेटवून दिला. प्लास्टिक जळाल्याने परिसरात काही काळ दाट धुराचे साम्राज्य पसरले होते. या धुरामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ आणि तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागल्याचे स्थानिकांनी सांगितले.

विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना अशा धुराचा अधिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, प्लास्टिक जाळल्याने हवेत विषारी वायू मिसळतात. त्यामुळे वायू प्रदूषण वाढून मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच मातीची सुपीकता कमी होणे, झाडे-वनस्पतींना हानी पोहोचणे आणि जैवविविधतेवरही विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उघड्यावर प्लास्टिक जाळण्यास बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.या प्रकरणाची संबंधित प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण विभागाने गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.“पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या अशा प्रकारांवर तातडीने कारवाई व्हावी,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

13 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago