शिरूर (सुनिल जिते): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील सोदकवस्ती परिसरातील डाळिंबाच्या बागेत चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या तीन चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. शिरूर पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करून त्यांच्याकडील दुचाकी व चोरीसाठी आणलेली गोणपाटे जप्त केली आहेत.
याप्रकरणी शेतकरी रोहीदास पोपट हिल्लाळ (वय ४१, रा. सोदकवस्ती, टाकळी हाजी, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव संतोष उचाळे (वय २७, रा. उचाळेवस्ती, टाकळी हाजी), मिलिंद प्रकाश उकांडे (वय १९, रा. ओंकारनगर, केडगाव, जि. अहिल्यानगर) आणि अजित चंद्रकांत गावडे (वय २५, रा. होणेवाडी, टाकळी हाजी) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २६) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी रोहीदास हिल्लाळ यांच्या मालकीच्या साबळेवाडी येथील गट क्रमांक १०३ मधील डाळिंबाच्या बागेत बेकायदेशीर प्रवेश केला. बागेतील डाळिंबाची फळे चोरून नेण्याच्या तयारीत असतानाच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
आरोपी चोरीसाठी हिरो स्प्लेंडर दुचाकी (एमएच १२ व्हीएम ८५७१) वरून आले होते. चोरी केलेली डाळिंबे भरण्यासाठी त्यांनी सोबत गोणपाटेही आणली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून दुचाकी व गोणपाटे जप्त केली आहेत.शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे करीत आहेत.
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…
रोहा रेल्वे स्थानकाच्या उन्नतीकरणाच्या भूमिपूजनासाठीही मागितली वेळ मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त…