महाराष्ट्र

NEP-2020 अंमलबजावणीला गती; राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना

मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 (NEP-2020) ची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री Chandrakant Patil यांनी ही माहिती दिली.

या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम, Academic Bank of Credits (ABC), Major-Minor पद्धती, Internship, Indian Knowledge System (IKS), Credit Transfer, Multiple Entry-Exit, Uniform Academic Calendar तसेच शिक्षक प्रशिक्षण यांसारख्या विषयांवर ही समिती धोरणात्मक मार्गदर्शन करणार आहे.

राज्यातील विद्यापीठे व स्वायत्त महाविद्यालयांमधील NEP अंमलबजावणीचा नियमित आढावा घेऊन समिती शासनाला शिफारशी सादर करणार असून दर तीन महिन्यांनी प्रगती अहवालही देणार आहे. उच्च शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित, संशोधनाभिमुख आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विनोद कांबळींच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी शिंदेंनी घेतली; मुलांच्या शिक्षणाचाही खर्च उचलणार!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

1 तास ago

घोड धरणाच्या संपादित क्षेत्रातही वाळू माफियांचा ११ ब्रास वाळूचा बेकायदेशीर साठा; अज्ञात इसमावर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शासनाच्या मालकीच्या आणि घोड धरणासाठी संपादित केलेल्या क्षेत्रातच महसूल विभागाची परवानगी न…

13 तास ago

शिरुर; कर्ज पाच लाखांचे, व्याजापोटी उकळले ४ लाख २० हजार; तरीही सावकाराचा पैशांसाठी तगादा

शिरुर (तेजस फडके) गरजवंताच्या आर्थिक अडचणीचा फायदा उठवून त्याला व्याजाच्या जाळ्यात अडकवायचे, अवाच्या सव्वा व्याज…

13 तास ago

डिलिमिटेशन विधेयकावर काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची फेररचना नको; महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप…

1 दिवस ago

घोळूची भाजी म्हणजे शेतातील सोन्याची खाण

पर्स्लेन (पोर्टुलाका ओलेरेसिया) ही एक पानेदार हिरवी वनस्पती आहे जी बहुतेक वेळा तण मानली जाते…

1 दिवस ago

साखर आरोग्यास अपायकारक

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. त्याआधी भारतीय…

1 दिवस ago