मुंबई: “लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही, तर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे,” असे सांगत विधान परिषदेतील काँग्रेसचे विधिमंडळ नेते सतेज (बंटी) पाटील यांनी राम शिंदे यांना पत्र लिहून महाराष्ट्र लोकसेवा आयोग संदर्भातील सभागृहात विचारलेल्या प्रश्नांना सरकारने सविस्तर, वस्तुनिष्ठ आणि समाधानकारक उत्तरे द्यावीत, अशी मागणी केली आहे.
सतेज पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संबंधित परीक्षा, भरती प्रक्रिया, पेपरफुटी, रिक्त पदे आणि भरतीतील विलंब या मुद्द्यांमुळे लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या गंभीर प्रश्नांवर केवळ औपचारिक नव्हे, तर स्पष्ट, जबाबदार आणि तथ्याधारित उत्तरे देणे सरकारचे कर्तव्य आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळालाच पाहिजे. लोकशाहीतील उत्तरदायित्व कायम राखण्यासाठी सरकारने या मागणीची तातडीने दखल घेऊन सभागृहात उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडावी, अशी मागणीही सतेज पाटील यांनी आपल्या पत्रातून केलीआहे.
मुंबई: नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करावी आणि…
पचन सुधारते आलं पाचक रस वाढवतं, गॅस व अपचन कमी करतं दाहशामक (Anti-inflammatory) सांधेदुखी, स्नायू…
झोप ही प्रत्येकालाच आवडते आणि प्रत्येकाची झोपण्याची शैली वेगवेगळी असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप…
आपण अस्वस्थ होतो तेव्हा नेहमी शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय जेव्हा जखम होते तेव्हा…
छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आयोजित 'एल्गार अन्नदात्याचा' आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश…
मुंबई: संगमनेर येथे १२ वर्षीय मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणात ९० दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपीचा…