महाराष्ट्र

TET पेपरफुटीप्रकरणी विधानभवनात शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे; NSUI चे आंदोलन

मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीप्रकरणी काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI आक्रमक झाली असून, आज विधानभवन परिसरात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवत तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

NSUI महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी व कार्यकर्ते विधानभवन परिसरात जमले होते. शिक्षणमंत्री दादा भुसे विधानभवनातून बाहेर पडत असताना त्यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवण्यात आले. “पेपरचोर सरकार हाय हाय”, “दादा भुसे राजीनामा द्या”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा”, “पेपरफुटी करणाऱ्यांना अटक करा”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी सागर साळुंखे यांनी आरोप केला की, राज्यात स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. TET पेपरफुटीप्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी सागर साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, पोलिस कारवाईनंतरही आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू ठेवत विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, TET पेपरफुटीविरोधातील काँग्रेसचे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. यापूर्वी महाराष्ट्र युवक काँग्रेसने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर निदर्शने केली होती. त्यानंतर आज NSUI ने विधानभवनात आंदोलन छेडले. राज्यातील विविध जिल्ह्यांतही काँग्रेस, युवक काँग्रेस आणि NSUI यांच्या वतीने पेपरफुटीविरोधात आंदोलने सुरू असल्याचा दावा करण्यात आला.काँग्रेसने इशारा दिला आहे की, TET पेपरफुटीप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, निष्पक्ष चौकशी आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य होईपर्यंत राज्यभर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

16 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

2 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

3 दिवस ago