मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भरती प्रक्रियेत मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. MPSC ची ऑनलाइन (CBT) परीक्षा पद्धत आणि Normalization तातडीने रद्द करून पारदर्शक ऑफलाइन परीक्षा घ्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
बेलापूर येथे MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसतर्फे सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आबा दळवी, धनंजय शिंदे, गुरुचरण बच्छर, सय्यद नासीर हुसेन, संतोष शेट्टी आणि आनंद सिंग यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले की, राज्य सरकारला एकही परीक्षा पारदर्शकपणे घेता येत नाही. MPSC च्या ऑनलाइन परीक्षा खाजगी कंपन्यांकडे सोपवण्यात आल्या असून या प्रक्रियेवर विद्यार्थ्यांचा विश्वास उरलेला नाही. नोकऱ्यांसाठी पैशांचा व्यवहार होत असल्याचे आरोप होत असून संपूर्ण प्रणाली भ्रष्टाचाराने ग्रासली आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा पद्धत रद्द करून ऑफलाइन आणि पारदर्शक परीक्षा घेण्याची मागणी त्यांनी केली.
आंदोलन सुरू होऊन अनेक दिवस झाले तरी सरकार किंवा MPSC चा एकही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नसल्याचा आरोप करत, सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली. मागण्या मान्य होईपर्यंत काँग्रेसचे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राम मंदिरातील कथित देणगी चोरीच्या प्रकरणावरूनही सपकाळ यांनी सरकारवर निशाणा साधला. राम मंदिरातील कथित चोरीचा मुद्दा झाकण्यासाठी सिद्धीविनायक मंदिरातील चोरीचा मुद्दा पुढे आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…