मुंबई: मुंबई प्रेस क्लब चे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ छायाचित्रकार पत्रकार रजनीश काकडे (वय ५५) यांच्या दुःखद निधनाने पत्रकारिताविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने माध्यम क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
रजनीश काकडे हे केवळ अनुभवी छायाचित्रकार नव्हते, तर अनेक पिढ्यांतील तरुण छायाचित्र पत्रकारांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक होते. आपल्या कॅमेऱ्यातून त्यांनी अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण क्षण अत्यंत संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणे टिपले. त्यांच्या छायाचित्रांमधून वास्तवाचा अचूक वेध घेतला जात असे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या काकडे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘दैनिक सकाळ’मधून केली. त्यानंतर त्यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये तीन वर्षे काम केले. पुढे ते आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेस मध्ये दाखल झाले आणि मागील अठरा वर्षांपासून ते तेथे कार्यरत होते.
मुंबईच्या पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे योगदान केवळ छायाचित्रांपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी अनेक तरुण छायाचित्रकार घडवले, संस्थांना बळ दिले आणि पत्रकारितेच्या सर्वोत्तम परंपरा जपल्या. त्यांची विनम्रता, तल्लख नजर आणि पत्रकारितेबद्दलची अढळ निष्ठा यासाठी ते सदैव स्मरणात राहतील.
रजनीश काकडे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगी संपूर्ण पत्रकारिताविश्व त्यांच्या सोबत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…