महाराष्ट्र

अजित पवार यांच्यासह माजी सदस्यांवरील शोकप्रस्ताव; दुःख एका पक्षाचे नसते, सभागृहात भावनिक वातावरण

मुंबई: महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सुरुवात भावनिक वातावरणात झाली. प्रथेनुसार पहिल्याच दिवशी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित अनंतराव पवार यांच्यासह माजी मंत्री सुरुपसिंग नाईक , माजी विधान परिषद सदस्य अशोक मोदक , गंगाधर पाटणे आणि नीला देसाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. १९९१ पासून परिचय आणि २००२ पासून विधान परिषदेत एकत्र काम करताना अनुभवलेल्या अनेक प्रसंगांचा त्यांनी उल्लेख केला. विरोधी पक्षात असतानाही जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे आणि निधीअभावीही सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांची कार्यपद्धती असल्याचे त्यांनी सांगितले.

लवासा परिसरातील गावांना वीजपुरवठा मिळावा यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेतल्याचा प्रसंगही त्यांनी कथन केला. २०१९ मध्ये उपसभापतीपदी बिनविरोध निवडीवेळी मिळालेले सहकार्य तसेच कोविड काळात रुग्णालयांच्या बिलांसंदर्भात दिलेली मदत यांचाही त्यांनी उल्लेख केला.

“राजकारणात भूमिका वेगळ्या असू शकतात; मात्र समाजकारणात सर्वसमावेशक दृष्टिकोन असावा, ही अजितदादांची भूमिका होती,” असे त्या म्हणाल्या. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व आमदारांचे मुद्दे संयमाने ऐकून घेण्याची त्यांची शैली उल्लेखनीय होती, असेही त्यांनी नमूद केले.

इतर दिवंगत नेत्यांबाबत बोलताना सुरूपसिंग नाईक यांनी नंदुरबार-नवापूर भागातील आर्थिक विकास आणि व्यसनमुक्ती क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याचे सांगण्यात आले. अशोक मोडक यांनी ऐतिहासिक स्मारकांच्या विषयांवर सातत्याने भूमिका मांडली. गंगाधर पटने यांनी ग्रंथालय चळवळ उभी करण्यात योगदान दिले, तर शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदारांपैकी नीला देसाई प्रभावी वक्त्या आणि आक्रमक नेतृत्वासाठी ओळखल्या जात होत्या.

शोकप्रस्तावादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी पवार कुटुंबीयांनी दाखवलेल्या संयमाचे कौतुक केले. “दुःख एका पक्षाचे नसते; संपूर्ण महाराष्ट्राने एकत्र राहण्याची गरज आहे,” असे आवाहन करत त्यांनी वैयक्तिक दुःखावर सार्वजनिक टीका करणे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात दाटलेले भावनिक वातावरण आणि अजितदादांच्या आठवणींनी सर्वपक्षीय सदस्यांना एकत्र आणल्याचे चित्र पाहायला मिळाले

शिरूर तालुका टीम

Recent Posts

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

21 मिनिटे ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

25 मिनिटे ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

29 मिनिटे ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

37 मिनिटे ago

नाना पाटेकर-सतीश पुळेकरांच्या मैत्रीत दुरावा; ‘इतकी चांगली मैत्री संपली’, पुळेकरांची खंत

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते सतीश पुळेकर यांची एकेकाळची गाजलेली मैत्री…

40 मिनिटे ago

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडाल? जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन संपूर्ण प्रक्रिया

मुंबई: कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे आणि त्याचे नाव शिधापत्रिकेत (रेशन कार्ड) समाविष्ट करायचे…

45 मिनिटे ago