महाराष्ट्र

घाटकोपरच्या रामजीनगरातील तुंबलेल्या शौचालयांवरून महापालिकेला धारेवर; महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील रामजीनगर परिसरातील तुंबलेली सार्वजनिक शौचालये, अस्वच्छता आणि प्रचंड दुर्गंधीमुळे स्थानिक महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे. या प्रश्नावर त्यांनी मुंबई महापालिकेच्या परिमंडळ-६ चे उपायुक्त आणि ‘एन’ विभागाच्या सहायक आयुक्तांना ई-मेलद्वारे पत्र पाठवत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

रामजीनगर येथील महिलांच्या सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था दूर करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी महापालिका प्रशासनाला प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले होते. त्यावर १६ जून रोजी महापालिकेने आवक शिक्का देऊन निवेदनाची पोचही घेतली. मात्र, दोन महिने उलटूनही शौचालयांची स्वच्छता किंवा दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप मातेले यांनी केला आहे.

दरम्यान, रविवारी सायंकाळी रामजीनगर परिसरातील काही महिलांनी ॲड. अमोल मातेले यांच्या कार्यालयात भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. शौचालये पूर्णपणे तुंबलेली असून अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे वापर करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

“एकीकडे मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणवले जाते आणि दुसरीकडे महिलांना रात्रीच्या वेळी उघड्यावर शौचास जाण्याची वेळ येत असेल, तर ही महापालिका प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे. रात्रीच्या अंधारात उघड्यावर जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल ॲड. मातेले यांनी उपस्थित केला.

महिलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन तुंबलेल्या शौचालयांची तातडीने साफसफाई व दुरुस्ती सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास परिसरातील महिलांना सोबत घेऊन महापालिकेच्या ‘एन’ विभाग कार्यालयावर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; तब्बल १ कोटी ५२ लाखांचा २५० किलोहून अधिक गांजा जप्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २५० किलोहून अधिक…

12 तास ago

जांभूळ खाताना या चुका करु नका

जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. पोटदुखी, मधुमेह, आमांश, संधीवात आणि इतर अनेक पचन समस्या…

23 तास ago

अशी घ्या दातांची काळजी

आपल्या एकंदर आरोग्याचा, सुद‍ृढतेचा आपल्या दातांच्या आरोग्याशी थेट संबंध असतो. दात चांगले असतील तर पचनसंस्थाही…

23 तास ago

ताक पितानाची एक लहानशी चूक तुम्हाला पोहचवू शकते दवाखान्यात

ताक हे शरीराला थंडावा देणारे आणि पचनासाठी हलके पेय मानले जाते. त्यामुळे जेवणासोबत किंवा जेवणानंतर…

23 तास ago

प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा बंधनकारक! पाण्याचा थेंब न थेंब अडविण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

‘व्हीबी-जी रामजी’ योजनेतून मजुरांना काम; एक कोटी शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत – महसूल मंत्री चंद्रशेखर…

23 तास ago

झिशान सिद्दीकी मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी; सिद्धार्थ कांबळेंची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी!

मुंबई : मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार झिशान सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय…

23 तास ago