महाराष्ट्र

मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय! ‘राष्ट्रवादी’ने मराठ्यांचा फक्त वापर केला

मुंबई: मागच्या पाच टर्मपासून आमदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी थेट स्वपक्षावर आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा केवळ आणि केवळ वापर केला, मंत्रिपद देण्याची संधी आली तेव्हा ओबीसी आणि मागासवर्गीयांना संधी दिली, असा घणाघात आमदार सोळंकेंनी केला.

शुक्रवारी पुण्यामध्ये बोलताना अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्याविषयी भाष्य केलं होतं. त्यांच्यावरील आरोप बाजूला झाले की त्यांना संधी देऊ, असं पवार म्हणालेले. त्यानंतर अनेक स्तरांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यातच बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सोळंकेंना मंत्रिपद मिळण्याविषयी चर्चा होत होती, त्यावर ते बोलले.

काय म्हणाले प्रकाश सोळंके

”मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय. मी पाचवी टर्म आमदार आहे, अनुभवी आहे, मला पक्षाचा (राष्ट्रवादी काँग्रेस) ३५ वर्षांचा इतिहास माहिती आहे. पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीने बीड जिल्हा हा ओबीसींसाठी राखीव असावा, असं वाटतंय. इथे बहुजन समाजाला कुठलंही स्थान द्यायचं नाही, असं पक्षाने ठरवल्याचं दिसंतय.”

सोळंके पुढे म्हणाले, पक्षाचा इतिहास मला माहिती आहे. बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थक राहिलेला आहे. मागील अनेक निवडणुकीचे दाखले देता येतील. केवळ आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठिंबा दिलेला आहे. परंतु मंत्रिपद देताना मात्र कायम ओबीसींना आणि इतरांना संधी दिली जाते. शरद पवारांनीही तेच केलं आणि अजित पवारही तेच करत आहेत. मराठा समाजाकडे ढुंकूनही बघितलं जात नाही, ही वस्तूस्थिती आहे.. हे माझे अनुभवाचे बोलत आहेत. अशा शब्दात त्यांनी स्वपक्षावर ताशेरे ओढले.

धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या संकेतांवर सोळंके म्हणाले, अजित पवारांनी काय संकेत दिले आहेत हे मला माहिती नाही. परंतु ते आमच्याच पक्षाचे आमदार आहेत, माझ्या शेजारचा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो.

धनंजय मुंडेंना मिळलेल्या क्लिनचीटवर सोळंके म्हणाले, त्याबाबतीत माझे जे काही मत आहे ते मी पक्षश्रेष्ठींना कळवणार आहे. महादेव मुंडे प्रकरणावर सोळंके म्हणाले, खून प्रकरणात नवनवीन माहिती पुढे येत आहे. २० महिने झाले तरी आरोपी निष्पन्न होत नाहीत. अजूनही वेळ गेलेली नाही. नवीन माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हे दाखल करणं गरेजचं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

4 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

4 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

4 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

4 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

4 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

4 तास ago