संभाजीनगर: तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकत. कारण केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील KVS आणि NVS मध्ये 12,000 हून अधिक शिक्षक पदांची भरती होण्याचे संकेत मिळाले आहेत.
जर तुमचं D.Ed किंवा B.Ed पूर्ण झालं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे.
रिक्त जागांची माहिती
केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) – 7,765 पदे
नवोदय विद्यालय समिती (NVS) – 4,323 पदे
NCERT – 143 ग्रुप A पदे
NCTE – 60 पदे
ही माहिती शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी नुकतीच राज्यसभेत दिली आहे.
ही पदे रिक्त का आहेत
नवीन शाळा सुरू होणे
शिक्षकांचा निवृत्त होणे
विद्यमान शिक्षकांनी नोकरी सोडणे किंवा बदली
पदोन्नतीमुळे पदे मोकळी होणे
भरती प्रक्रिया कधी सुरू होणार
शासनाकडून सांगण्यात आलं आहे की या रिक्त जागांवर लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सध्या तांत्रिक व प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आहे.
वेतन किती मिळणार
PGT – ₹47,600 ते ₹1,51,100 दरमहाTGT व परत यापेक्षा थोडं कमी पण आकर्षक वेतन
महत्त्वाचे
ही भरती सतत सुरू असलेली प्रक्रिया आहे.
तुम्ही संबंधित पोर्टल्स आणि अधिकृत जाहिरातींवर लक्ष ठेवा.
भरती प्रक्रिया सुरू झाल्यावर अर्ज, पात्रता, परीक्षा याची सविस्तर माहिती मिळवा.
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…
आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…
पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…